नमन लोककला संस्थेचे २३ पुरस्कार जाहीर

मुंबई : येथील नमन लोककला संस्थेचे २३ पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील कलाकारांना जाहीर झाले आहेत. पुरस्कारांचे हे दुसरे वर्ष आहे.

नमन ही कोकणची समृद्ध लोककला असून कोकणाचे वैभव आहे. या लोककलांचा वारसा जपणारे लोककलावंत कोकणवासीयांसाठी अनमोल रत्ने आहेत. लोककलेच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करणाऱ्या कलावंतांना संस्थेतर्फे गेल्या वर्षीपासून पुरस्कार दिले जात आहेत. यावर्षी १३ जणांना लोककला गौरव पुरस्कार, तर १० जणांना लोककला गौरव पुरस्कार देण्यात येणार आहेत. हे पुरस्कारविजेते असे – पांडुरंग यशवंत बापर्डेकर (चुनाकोळवण, राजापूर), गोविंद धोंडू मांडवकर (माचाळ, लांजा), सुभाष रामाणे (गवाणे, लांजा), राजाराम सखाराम फापे (कोचरी, लांजा), दत्ताराम धोंडू वाजे (मोर्डे, संगमेश्वर), मधुकर रामचंद्र घाणेकर (निवोशी, गुहागर), शंकर विश्राम बारगोडे (वेळंब, गुहागर), सीताराम नारायण शिंदे (कळझोंडी, रत्नागिरी), रघुनाथ रामचंद्र चोगले (मुरादपूर, संगमेश्वर), दत्ता वीर (कळझोंडी, रत्नागिरी), भागोजी महादेव दुर्गोळी (वीर, चिपळूण), विलास सोनू सोलकर (वाकी, गुहागर), अशोक सोन्या नाचरे (तवसाळ, गुहागर), महादेव गोविंद धोपट (वाटद, रत्नागिरी), किरण बाळकृष्ण बाईंग (तेरवण, राजापूर), दीपक केरू मासये (मंदरूळ, ओणी, राजापूर), सुरेश राऊत (गांगोवाडी, लांजा), नितीन रामचंद्र बांडागळे (मुरादपूर, संगमेश्वर), रामचंद्र धोंडू मांडवकर (पालपेणे, गुहागर), मनोहर बाबू गुडेकर (सावर्डे, चिपळूण), सतीश रामचंद्र जोशी (रत्नागिरी), नितीन यशवंत गोपाळ (कोलेवाडी, देवरूख).

पुरस्कार वितरण सोहळा येत्या १७ डिसेंबर रोजी मुंबईत गिरगाव येथील साहित्य संघ मंदिरात सकाळी १० वाजता होणार आहे. शाहीर विनोद फटकरे निर्मित काळेश्वरी नाट्य नमन मंडळाचे नमन यावेळी सादर करण्यात येणार आहे. समारंभाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रवींद्र मटकर यांनी केले आहे.

विशेष पुरस्कार जाहीर झालेले देवरूख कोलेवाडी नमन मंडळाचे कलाकार नितीन यशवंत गोपाळ रिक्षा व्यावसायिक आहेत. आपला व्यवसाय सांभाळत ते लोककलेचा वारसा जपत आहेत. त्यांनी ३५ वर्षांपूर्वी आपली कला सादर करायला सुरुवात केली. सुरुवातीला कृष्ण, नंतर स्त्री पात्र, राजकुमार, व्हीलन, डाकू, रावण, यम अशा वेगवेगळ्या भूमिका ते करतात. घोडा नाचवणे, बैल नाचवणे यासारख्या नावीन्य पूर्ण भूमिका करून कलेचा वारसा अजून समृद्ध आपण करत असल्याचे सांगून श्री. गोपाळ यांनी पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त केले.

नितीन गोपाळ यांच्या विविध भूमिका

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply