Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

लांज्यात २०-२१ जानेवारीला जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

Advertisements

रत्नागिरी : साईबाबा सोशल अॅन्ड स्पोर्टस क्लब सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी शाखेतर्फे येत्या २० आणि २१ जानेवारीला लांजा येथे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, कुमार गट (१८ वर्षांखालील मुले), कुमारी गट (१८ वर्षांखालील मुली), किशोर गट (१४ वर्षांखालील मुले) आणि किशोरी गट (१४ वर्षांखालील मुली) अशा सात गटांत होणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी एकेरी गटासाठी प्रत्येकी १५० रुपये आणि पुरुष दुहेरीसाठी ३०० रुपये राहील. प्रत्येक गटात किमान८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवश्यक आहे. अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करण्यात येईल.

इच्छुक सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका बुधवार, १७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच स्पर्धा शुल्कासह सादर कराव्यात. स्पर्धेत सामना खेळणासाठी पांढरा रंगाचा टीशर्ट किंवा शर्ट खेळाडूने परिधान करणे आवश्यक आहे.

प्रवेशिका सादर करण्याची ठिकाणे अशी – गुहागर – प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०), रत्नागिरी – विनायक जोशी (८३९०३८७४८३), देवरूख — राहल भस्मे (९६५७६३७६७८), चिपळूण — साईप्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), दिपक वाटेकर (९९७५५४६६२५), संगमेश्वर — मनमोहन बेंडके (९१३०३०६५२५), लांजा — विकास इंदुलकर (९४०३७६९४४९), खेड — योगेश आपटे (९९५३२२२६३९) ८) राजापूर — मनोज सप्रे (९४०३७६८३७६).

स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून राज्यस्तरीय पंच साईप्रकाश कानिटकर आणि मनोज जाधव यांची निवड करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी स्पर्धा प्रमुख सचिन बंदरकर काम पाहणार आहेत. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचय अण्णा रेडीज, सचिव मिलिंद साप्ते यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version