लांजा : भांबेड (ता. लांजा) येथील श्री समर्थ कृपा स्पोर्टस क्लबने रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा येत्या २७ आणि २८ मे रोजी लांजा येथे आयोजित केली आहे.
रत्नागिरी जिल्हा कॅरस असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा लांजा येथील कुणबी सेवा संघ हॉल होईल. स्पर्धेत ब्रेक टू फिनिश व ब्लॅक टू फिनिश नोंदविणाऱ्या खेळाडूंना प्रथम फेरीपासून खास रोख पारितोषिके देण्यात येतील.
ही स्पर्धा पुरुष एकेरी, महिला गट एकेरी, पुरुष दुहेरी, कुमार गट, कुमारी गट, किशोर गट आणि किशोरी गट अशा सात गटांत खेळविली जाणार आहे. स्पर्धा अखिल भारतीय कॅरम फेडरेशन (राष्ट्रीय संघटना) आणि आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनच्या प्रचलित स्पर्धा नियमावलीनुसार होईल. या क्रीडा वर्षातील ही दुसरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा असल्याने खेळाडूंनी २०२३–२४ या वर्षाचे ५० रुपये नोंदणी शुल्क जिल्हा असोसिएशनकडे जमा करावे. स्पर्धेसाठी एकेरी गटासाठी प्रत्येकी १५० रुपये, तर दुहेरी गटासाठी प्रत्येकी ३०० रुपये राहील. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवश्यक आहे. अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करण्यात येईल. इच्छुक सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका २३ मे २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत स्पर्धा शुल्कासह द्यावयाच्या आहेत. स्पर्धेत सामना खेळणासाठी पांढरा रंगाचा टीशर्ट किंवा शर्ट खेळाडूने परिधान करणे आवश्यक आहे.
स्पर्धकांना गुहागर (प्रदीप परचुरे – ९४२३०४८२५०), रत्नागिरी (विनायक जोशी -८३९०३८७४८३), देवरूख (मोहन हजारे -९४२२०५३९४३, राहुल भस्मे ९६५७६३७६७८), चिपळूण (साईप्रकाश कानिटकर -९४०३५६४७८२, दीपक वाटेकर – ९९७५५४६६२५), संगमेश्वर (मनमोहन बेंडके -९१३०३०६५२५), लांजा (विकास इंदुलकर -९४०३७६९४४९) आणि खेड (योगेश आपटे – ०९९५३२२२६३९) येथे प्रवेशिका सादर करता येतील.
स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून राष्ट्रीय पंच साईप्रकाश कानिटकर आणि मनोज जाधव यांची निवड करण्यात आली आहे. स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेण्याचे आवाहन समर्थ कृपा स्पोर्टस क्लबचे विकास इंदुलकर, ,भांबेड ,लांजा, रत्नागिरी .), जिल्हा कॅरम असोसिएशन अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचयअण्णा रेडीज, सचिव मिलिंद साप्ते यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

