Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरात २२ जानेवारीला आनंदोत्सव

Advertisements

रत्नागिरी : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होत असलेल्या श्रीराम मंदिर नवनिर्मिती आणि प्रभू श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त येथील श्री विठ्ठल मंदिरात आनंदोत्सवाचे आयोजन केले आहे.

मंदिरात विद्युत रोषणाई व गीतरामायण लावले जाणार आहे. रांगोळ्यांनी मंदिर परिसर सजणार आहे.

हिंदू बंधू भगिनींच्या आणि श्री विठ्ठल मंदिर संस्थेतर्फे संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रमांद्वारे आनंदोत्सव साजरा होणार आहे. पहाटे नित्य काकडा आरतीने कार्यक्रमाची सुरवात होईल. सकाळी ७.३० ते ९.०० पर्यंत श्री विठ्ठल-रखुमाई मूर्तीवर पंचसूक्त पवमान अभिषेक, महापूजा होईल. याकरिता राजन फाळके सपत्नीक महापूजेला बसतील. ९.०० वाजता श्रीराम प्रतिमा पूजन सर्वांच्या हस्ते होईल. सकाळी ९.०० ते ९.१५ श्री अथर्वशीर्ष पठण, ९.१५ ते ९.३० श्री रामरक्षा स्तोत्रपठण, ९.३० ते १०.३० श्रीराम जयराम जयजयराम जप होईल. पठण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी श्रीमती फडके (86058 00948) यांच्याशी संपर्क साधावा. १०.३० ते १०.४५ श्री मारुती स्तोत्र पठण, ११.०० ते १.३० प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण व घंटानाद, ढोलवादन होईल.

दुपारी ३.०० ते ६.०० या वेळेत महिलांसाठी हळदीकुंकू, विविध भजने, ६.३० ते ८.०० श्रीसाईबाबा, श्रीस्वामी समर्थ, आणि श्री विठ्ठल-रुखुमाईच्या नित्य आरत्या होतील. सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत तीर्थप्रसाद वाटप होईल. २० ते २२ जानेवारीदरम्यान दररोज मंदिरात गीतारामायण लावले जाईल. तीन दिवस विद्युत रोषणाई केली जाईल. २२ जानेवारी रोजी रांगोळ्यांनी मंदिर व परिसर सजवला जाईल. सायंकाळी पणत्या लावून, विद्युत रोषणाई केली जाईल. बंधू भगिनींनी या दिवशी दिवसभराच्या कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version