Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

कोकण रेल्वे ठप्पच; अनेक गाड्या रत्नागिरीत रद्द; एसटी बसेसची व्यवस्था

Advertisements

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटी ते विन्हेरे या स्टेशन्सदरम्यान काल (१४ जुलै) संध्याकाळी दरड कोसळल्यामुळे ठप्प झालेली वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. दरड हटवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असलं, तरी अतिमुसळधार पावसामुळे कामात अडथळे येत आहेत. काल सुटलेल्या मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस आणि कोकणकन्या एक्स्प्रेस, तसंच तुतारी एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकातच रद्द करण्यात आल्या आहेत. अन्य स्थानकांमध्येही थांबवण्यात आलेल्या गाड्या त्याच स्थानकांमध्ये रद्द करण्यात आल्या आहेत.

प्रवाशांना मुंबईला सोडण्यासाठी एसटी बसेसची व्यवस्था करण्यात येत असून, रत्नागिरी स्थानकात ४०, चिपळूण स्थानकात १८, तर खेड स्थानकात १० बस पाठवल्या जात आहेत. आज (१५ जुलै) सुटणाऱ्या जनशताब्दी, मांडवी, तुतारी एक्स्प्रेससह काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. प्रवाशांनी माहिती घेऊनच प्रवास करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version