Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

त्रिपुट जहाजाच्या जलावतरणाचा सोहळा अनोखा : दीपक पटवर्धन

Advertisements

रत्नागिरी : गोवा शिपयार्डने स्वतः निर्माण केलेल्या महाकाय त्रिपुट जहाजाच्या जलावतरण समारंभास पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. हा समारंभ अनोखा होता, अशा शब्दांत गोवा शिपयार्डचे स्वतंत्र संचालक रत्नागिरीचे ॲड. दीपक पटवर्धन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

त्रिपुट या महाकाय जहाजाचे जलावतरण गोव्याचे राज्यपाल श्रीधर पिल्लयी यांच्या प्रमुख उपस्थितीत व ॲड. रिता श्रीधरन यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी ॲड. पटवर्धन यांना मिळाली. त्याबद्दलची माहिती त्यांनी दिली.

ते म्हणाले, हा कार्यक्रम अत्यंत शानदार होता. गोवा शिपयार्डचे अधिकारी, नेव्हीचे अधिकारी यांच्यासमवेत गोवा शिपयार्डचे अध्यक्ष ब्रिजेश उपाध्याय, संचालक जगमोहन, दुसरे संचालक श्री. बागी समारंभाला उपस्थित होते. हिंदू धर्मशास्त्र पद्धतीनुसार जहाजाचे पूजन करण्यात आले आणि क्रेन आणि नवतंत्रज्ञान जेटीच्या माध्यमातून जहाजाला पाण्याचा पहिला स्पर्श झाला.

या महाकाय जहाजाचे नाव त्रिपुट ठेवण्यात आले. त्रिपुट जहाज रशियाच्या मदतीने गोवा शिपयार्डमध्ये तयार झाले. अनेक क्षेपणास्त्रे, रडार तसेच विमानतळ उपलब्ध असणारे हे महाकाय जहाज नेव्हीसाठी तयार केले जात आहे. या जहाजात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणास अनुरून आत्मनिर्भर भारत या संकल्पनेनुसार ५५ टक्के काम देशांतर्गत निर्माण केलेल्या साधनांचा वापर करून करण्यात येत आहे.

त्रिपुट नामकरण झाल्यानंतर जहाजावर भारताचा तिरंगा फडकवण्यात आला व तिरंग्याला मानवंदना देण्यात आली, असे ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.

गेली ३ वर्षे गोवा शिपयार्डचे काम करत असताना या जहाजासंदर्भात अनेक निर्णय करण्याच्या प्रक्रियेत मला सहभागी होता आले, ही बाब अभिमानाची आहे, असेही ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version