Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

शिवसेना ठाकरे पक्षातर्फे रत्नागिरी शहर गणेशोत्सव सजावट स्पर्धा

Advertisements

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रत्नागिरी शहर मर्यादित घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी प्रवेश विनामुबल्य असून प्रवेशिका ६ सप्टेंबरबर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ७७७७, ५५५५ आणि ३३३३ रुपये रोख, सन्मानचिन्ह दिले जाईल. उत्तेजनार्थ बक्षिसेही रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह स्वरूपाची असतील.

स्पर्धेसाठी नितीन तळेकर (8275635222), श्रीकृष्ण चव्हाण (9423291824), अमित खडसोडे (8007233723),
सौ. मनीषा बामणे (8788932226), सौ. सेजल बोराटे (7507559335) किंवा श्रीमती विजया घुडे (9370259104) यांच्याशी संपर्क साधावा.

सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन शिवसेना रत्नागिरी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी केले आहे.कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version