Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

Advertisements

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनने १३ ते १५ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरीच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा होईल. सिंगल्स, डबल्स आणि लकी डबल्स अशा विविध गटांमध्ये स्पर्धकांना भाग घेता येईल. भाग घेण्यासाठी इच्छुकांनी http://www.mbasso.in या संकेतस्थळाला भेट देऊन ११ डिसेंबरपूर्वी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. सिंगल्स, डबल्ससाठी ८०० रुपये, तर लकी डबल्ससाठी १००० रुपये नोंदणी शुल्क आहे.

सबज्युनिअर अँड ज्युनिअर चॅम्पियनशिप बॅडमिंटनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचे अध्यक्ष हिराकांत साळवी आणि सेक्रेटरी डॉ. संदीप करे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी बिपिनचंद्र गांधी (9403507507) किंवा नीलेश मलुष्टे (9422430044) यांच्याशी संपर्क साधावा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version