Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

टिळक आळी गणेशोत्सव मंडळ जिल्ह्यात प्रथम

Advertisements

रत्नागिरी : राज्य शासनाच्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत रत्नागिरीच्या टिळक आळीतील मारुती गणपती पिंपळपार देवस्थान मंडळ जिल्हास्तरावर प्रथम आले आहे. मुंबईच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत राज्य सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचा निकाल पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 24 सप्टेंबरच्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला. त्यानुसार हे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. मंडणगडच्या पालघरवाडी मंडळाने दुसरा, तर राजापूरच्या जैतापूरचा राजा मंडळाने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
जिल्हा स्तरावरील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे 50 हजार, 40 हजार आणि 30 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. तालुकास्तरावर गुहागर तालुक्यातील श्री निळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळ, लांजा तालुक्यातील श्री सत्यनारायण उत्साही मंडळ, संगमेश्वर तालुक्यातील युवा गणेश मित्रमंडळ निवे बुद्रुक व खेड तालुक्यातील शिवनेरी नगर मित्रमंडळ या मंडळांना विजेतेपद मिळाले आहे. या विजेत्या मंडळाना प्रत्येकी 25 हजार रुपये रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Kokan Media (@kokanmedia)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version