रत्नागिरी केंद्र
आजचे नाटक (२४ मार्च २०२२) – शिक्का कट्यार
सादर करणारी संस्था – मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक क्रीडा संघ, गोवा
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरीत साठावी संगीत राज्य नाट्य स्पर्धा १० मार्च ते २७ मार्च दरम्यान होणार आहे. हौशी रंगभूमीवरील संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरते. या वर्षी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या एकूण सोळा संघांनी प्रवेश घेतला आहे. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात दररोज सायंकाळी ७ वाजता स्पर्धेतील नाट्यप्रयोग सुरू होईल. (स्पर्धेचे प्रयोगपंचांग शेवटी दिले आहे.)
आज २४ मार्च २०२२ रोजी शिक्का कट्यार हे नाटक मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक क्रीडा संघ, गोवा या संस्थेने सादर केले.
मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव कला आणि सांस्कृतिक मंडळ, मोरजी, पेडणे, गोवा हे मंडळ गेली पाच वर्षे सातत्याने नाट्यनिर्मिती करत आहे. मंडळाने आतापर्यंत लावणी भुलली अभंगाला, शिक्का कट्यार, गोरा कुंभार, सिंहाचा छावा, मंदारमाला, सावता माळी, सौभद्र ही संगीत नाटके संस्थेने सादर केली आहेत. नाटकात नव्या आणि जुन्या कलाकारांना वाव देण्याचा संस्थेचा हेतू असतो. मंडळाचे एक ध्येय आहे की, मंडळातून नवीन कलाकार घडावेत आणि त्यांना नाट्यक्षेत्रात मानाचे पान मिळावे.
यावर्षी शिक्का कट्यार या ऐतिहासिक नाटकाची महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेसाठी निर्मिती करण्यात आली आहे. संभाजी महाराजांचा पुत्र शाहू आणि ताराराणी यांच्या जीवनावर आधारित हे नाटक आहे. लहानपणी शाहूला आणि येसूबाईंना औरंगजेब कैद करतो. ताराऊ शाहू महाराजांना औरंगजेबाच्या तावडीतून सोडवून आणते आणि त्याला राज्यावर बसवतो. शाहू पुन्हा पातशहाच्या तावडीत सापडतो. जवळजवळ बारा वर्षे त्याला कैदेत ठेवले जाते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू सुटून येतो. आपले राज्य मागण्यासाठी तो ताराऊंकडे जातो. तेथेच त्यांचा संघर्ष सुरू होतो. शाहू बरेचसे सरदार आपल्या बाजूने वळवतो. त्यादरम्यान त्याला राजकुँवर भेटते. ती त्याच्या प्रेमात पडते. शेवटी शाहूचा विजय होतो. तरीही राज्य आपणच चालवणार, असा ताराऊचा हट्ट असतो. राजकुँवर, धनाजी, खंडोजी त्यांचा हा हट्ट हाणून पाडतात. शेवटी ताराऊ निघून जाते. शाहू गादीवर बसतो. त्याचा राजकुँवरशी विवाह होतो.
हे नाटक संस्थेने गोवा कला अकादमीच्या नाट्य महोत्सवात २०१८ साली सादर केले होते. कला अकादमीच्या निरीक्षकांकडून चांगले नाटक म्हणून कौतुकाची थाप मिळाली. हे मंडळ राज्य नाट्य स्पर्धेत दुसऱ्यांदा सहभागी होत आहे. यापूर्वी २०१९ साली लावणी भुलली अभंगाला हे नाटक संस्थेने अहमदनगर येथे सादर केले होते.
श्रेयनामावली :
लेखक : यशवंत नारायण टिपणीस
दिग्दर्शक : साबाजी च्यारी
ऑर्गन : चांगदेव धोंडू नाईक
तबला : सुविशांत विनायक बोर्डेकर
पार्श्वसंगीत : आनंद गजानन बावकर
रंगभूषा : अनंत चंद्रकांत कानोळकर
वेषभूषा : रिता विकास आजगावकर
प्रकाशयोजना : रविराज शेट, ओवतेश डी. नाईक
नेपथ्य : संतोष चौगुले, सूर्यकांत पेडणेकर, वसंत मोरजकर, दिनकर हळर्णकर
भूमिका आणि कलावंत :
शाहू : साबाजी गंगाराम च्यारी
धनाजी : वसंत सत्यवान शेटगावककर
खंडोजी : सर्वेश लाडू शेटगावकर
प्रतिनिधी : चंद्रो कृष्णा दाभोलकर
शिर्के : किशोर वामन म्हादळेकर
वेडा शिवाजी : गणेश जगन्नाथ गोसावी
ज्योत्याजी : प्रकाश महादेव आजगावकर
शुक्लाजी : समीर जनार्दन शेटगावकर
हकीमजी : विकास नामदेव आजगावकर
जासूद : देवानंद राजाराम गावडे
दरोडेखोर : सुनील न्हानू शेटगावकर, राजेश विनायक शेटगावकर, अजय (लक्ष्मण) शेटगावकर, महेश नवसो खोत
शिपाई : रूपेश पंढरीनाथ शेटगावकर, दीपक सोमा शेटगावकर
राजकुँवर : कु. शारदा शेटकर
ताराऊ : कु. अनघा विकास आजगावककर
सखू : कु. वैष्णवी विकास आजगावकर
स्पर्धेचे वेळापत्रक
२५ मार्च (सकाळी १०.३० वाजता) – संक्रमण, पुणे, आरंभी स्मरितो पाय तुझे, लेखक व दिग्दर्शक : यतिन माझिरे.
२५ मार्च (सायंकाळी ७.०० वाजता) – श्रुती मंदिर, सोलापूर, सूर-साज, लेखक व दिग्दर्शक : श्रीमती विद्या काळे.
२६ मार्च (सकाळी १०.३० वाजता) – कामगार अधिकारी कार्यालय, बृहन्मुंबई महापालिका, मुंबई, संगीत पंढरपूर, लेखक : जगदीश दळवी, दिग्दर्शक : वैशंपायन.
२७ मार्च – वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली, तुका म्हणे आता, लेखक : पु. ल. देशपांडे, दिग्दर्शक : रघुनाथ कदम.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड