सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

सिंधुदुर्गनगरी : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२३ मार्च २०२२) अवकाळी पावसाने हजेरी लावली. सह्याद्रीच्या पट्ट्यात तुफान अवकाळी पाऊस कोसळला. सायंकाळी ४ वाजल्यापासून वादळ, वारा सुरू होता आणि नंतर जोरदार पाऊस पडला. जिल्ह्याच्या बहुतांश भागांत प्रामुख्याने कणकवली, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यांत हा अवकाळी पाऊस पडला.

गेले काही दिवस हवामानात मोठा उष्मा निर्माण झाला होता. या अवकाळी पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कारण आंबा-काजू आदी कोकण मेव्याचा सध्याचा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. त्यामुळे बागायतदार अडचणीत येणार आहेत. पावसासोबतच विजांचा कडकडाटही असल्याने काही ठिकाणी विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला होता.

(कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील अवकाळी पावसाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply