pexels-photo-3952231.jpeg

रत्नागिरी जिल्हा करोनामुक्त; एकही सक्रिय रुग्ण नाही

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा आज (दि. २३ मार्च २०२२) करोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात उपचार सुरू असलेला एकमेव रुग्णही बरा होऊन घरी गेला आहे. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार ४६६ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८१ हजार ९३२ म्हणजे ९७ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेले सर्व १३० आणि रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेले सर्व १७८ रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख ३४ हजार २५६ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही करोनाबाधित रुग्ण नाही. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याने मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५३४ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२३, खेड २३१, गुहागर १८२, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२९, रत्नागिरी ८४१, लांजा १३२, राजापूर -१६७. (एकूण २,५३४).

जिल्ह्यातील लसीकरण

रत्नागिरी जिल्ह्यात २२ मार्च रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ४९ सत्रे पार पडली. त्यात १०३९ नागरिकांनी लशीचा पहिला, तर ८५२ जणांनी दुसरा डोस घेतला. शिवाय ७३ जणांनी बूस्टर डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण १९६४ जणांचे लसीकरण २२ मार्च रोजी झाले. २२ मार्चपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ५३ हजार ८८६ जणांचा पहिला, तर ८ लाख ७९ हजार ९०७ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण २० लाख ४० हजार ३०७ जणांचे लसीकरण झाले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply