७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त निवती बेटावरही झाले ध्वजवंदन

निवती (जि. सिंधुदुर्ग) : देशाचा ७७वा प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक बेटावरदेखील ध्वजवंदन करण्यात आले. निवती पोलिसांनी मच्छिमार बांधवांच्या उपस्थितीत हे ध्वजवंदन केले. निवती मेढा गावातील ६० ते ६५ मच्छिमार नौकांनी समुद्रातून ध्वजाला वंदन केले. या ध्वजवंदनाचा मान निवती मेढा गावचे मच्छिमार श्रीधर मेतर यांना देण्यात आला. या वेळी निवती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भीमसेन गायकवाड यांनी सलामी दिली. या वेळी तटरक्षक दल, मत्स्यविभाग, मेरिटाइम विभाग, तसेच निवती मेढा गावातील नागरिक उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply