Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरीत भगवान महावीर जन्मकल्याण उत्सव उत्साहात साजरा

Advertisements

रत्नागिरी : जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचा २६२५वा जन्मकल्याण उत्सव रत्नागिरी शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने श्वेतांबर जैन मूर्तिपूजक संघातर्फे जैन मंदिरात अभिषेक, पूजन व प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या वेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यातून आकर्षक रथ, धार्मिक देखावे आणि घोषवाक्यांमधून महावीरांच्या विचारांचा प्रसार करण्यात आला. लहान मुलांनी आणि युवकांनी या यात्रेत पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला होता. तसंच, महिलाही सहभागी झाल्या होत्या. अहिंसा आणि सहिष्णुतेची महावीरांची शिकवण आजच्या काळात अधिक महत्त्वाची असल्याचं मत या वेळी मान्यवरांनी व्यक्त केलं. अन्नदानासह सामाजिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते.

1 / 6

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version