वास्तुशास्त्र पदव्युत्तर पदविका परीक्षेत शिवप्रसाद धुपकर, पाटील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या वास्तुशास्त्र पदव्युत्तर पदविका परीक्षेमध्ये येथील शिवप्रसाद धुपकर आणि संजय पाटील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

शिवप्रसाद धुपकर
संजय पाटील

कालिदास विद्यापीठात वास्तुशास्त्राचा पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे. त्यामध्ये वास्तुमुहूर्त, पारंपरिक वास्तू व वास्तुसिद्धांत, पदव्युत्तर पद‌विका अभ्यासक्रमात संस्कृत, मयमतम्, समरोगण सूत्रधार, आधुनिक वास्तू व इतिहास, निबं(ध असे विषय विषय समाविष्ट आहेत.

घरात वाईट बोलू नये म्हणतात. कारण वास्तू नेहमीच तथास्तु । असे म्हणत असते. भिंतीलाही कान असतात, असे आपण ऐकतो. ते खरेच असल्पाचे अनुभवालाही येते.

आधुनिक वास्तुशास्त्रामध्ये भौतिक ऊर्जाचा विचार केला आहे. यातून रचना सुयोग्य केली जाते. भारतीय प्राचीन वास्तुशास्त्रात भौतिक ऊर्जांच्या बरोबरीने सूक्ष्म स्तरावरील ऊर्जांचाही विचार केला आहे. वास्तू ही निर्जीव वस्तू नसून एक सजीव वास्तुपुरुषाचे रूप म्हणून समजले जाते. घरामधे चालू असणाऱ्या असे हे लहान लहान कृतींचाही या शास्त्रामध्ये विचार केला आहे. शास्त्र शिकून घेण्याची संधी कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रामधे उपलब्ध झाली आहे.

विश्वकर्मप्रकाश, मयमतम्, बृहद्-संहिता, अपराजितपृच्छा, मानसार, मनुष्यालयचंद्रिका, समरोगणसूत्रधार, बृहद्-वास्तुमाला हे संस्कृत भाषेमधील ग्रंथ वास्तुशास्त्राचे प्रमाणग्रंथ मानले जातात. त्याचे हिंदी अनुवाद उपलब्ध आहेत, पण मराठी अनुवादाचे प्रमाण कमी आहे.

जयपूर, भोपाळ, उज्जैन, वाराणसी, प्रयागराज, अयोध्या शहरांची रचना वास्तुशास्त्राच्या आधारावर केली आहे. ही सर्व शहरे आजही त्यांचे महत्त्व राखून आहेत.

प्राचीन उपलब्ध संस्कृत ग्रंथांच्या आधारेच पदव्युत्तर पदविका वास्तुशास्त्राच्या अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. बाहेर खासगीरीत्या शिकवल्या जाणाऱ्या ठिकाणी अशा दर्जेदार प्राचीन ग्रंथांच्याऐवजी अन्य विचार घुसडले जातात आणि अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जाते. संस्कृत विद्यापीठात ते टाळण्यात आले आहे. विद्यापीठाचे ग्रंथालयही विद्यार्थ्यांना उपलब्ध असते.

श्री. धुपकर व श्री. पाटील अनुक्रमे नगररचना व विद्युत विभागातून निवृत्त झाले आहेत. त्यानंतर पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता त्यांना रत्नागिरी उपकेंद्र व विद्यापीठाचे सहकार्य लाभले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply