जिवंतपणी देशसेवा आणि मृत्युपश्चात देहदान; रत्नागिरीतील माजी सैनिक अनंत गोखले यांचे निधन

रत्नागिरी : माजी सैनिक अनंत नरहर गोखले यांचे अल्पशा आजाराने २० ऑगस्ट २०२६ रोजी निधन झाले. मूळचे कर्ला-लिमयेवाडी येथील रहिवासी असलेले गोखले ७८ वर्षांचे होते. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार अनंत गोखले पार्थिवाचे देहदान करण्यात आले. जिवंतपणी देशसेवेकरिता देह झिजवलेल्या गोखले यांनी मृत्युपश्चातही आपल्या देहाचा उपयोग वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी व्हावा, अशी उदात्त इच्छा बाळगून देहदान केले आहे.

रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेले हे बाविसावे देहदान आहे. २० ऑगस्टला गोखले यांचे पार्थिव वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले. या वेळी कै. गोखले यांची कन्या रूपाली लिमये, जावई मंदार लिमये, तसेच राजीव लिमये, मिताली भिडे, दिनेश आगाशे, शिरीष सोहोनी आणि मित्रपरिवार उपस्थित होता. या संपूर्ण प्रक्रियेसाठी समीर करमरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिष्ठाता डॉ. रामा भोसले, शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव, तसेच पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडिवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहीर लोंढे, राज पेडणेकर, श्रेयश जोशी, श्रीपाद गांधी आणि वाहनचालक प्रणय पाटील या साऱ्यांचे देहदान प्रक्रियेत सहकार्य लाभले. या समाजोपयोगी निर्णयाबद्दल अधिष्ठाता व महाविद्यालय प्रशासनाने गोखले कुटुंबीयांप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply