माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक ११ (भू येथील शाळेतील हर्डीकर गुरुजी)

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील ११वा लेख आहे वैजयंती विद्याधर करंदीकर यांचा… भू (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील जि. प. प्राथमिक आदर्श शाळा क्र. १मधील सुरेश मधुसूदन हर्डीकर यांच्याबद्दलचा…

प्रसिद्ध कादंबरीकार माधव कोंडविलकर यांचे निधन

रत्नागिरी : समाजातील तळागाळातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या व्यथा कायम लेखनात मांडून समाजव्यवस्थेविरुद्ध कायम आसूड ओढणारे तळमळीचे कार्यकर्ते व प्रसिद्ध लेखक माधव कोंडविलकर (वय ८०) यांचे १२ सप्टेंबर २०२० रोजी पहाटे रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात निधन झाले.

‘फलोद्यानाची कास धरली, तर कोकणवासीय श्रीमंत होतील’; डॉ. जी. डी. जोशींनी दिली विविध संधींची माहिती

राजापूर : भात आणि नाचणीच्या आतबट्ट्याच्या शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा कोकणातील शेतकऱ्यांनी फलोत्पादनाची कास धरली, तर कोकणवासीय श्रीमंत होतील, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. गोविंद जोशी यांनी केले.

रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी; जनजीवन विस्कळित

रत्नागिरी : काल (तीन ऑगस्ट) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून, काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खेड, चिपळूण आणि राजापूर शहरांना पुराचा वेढा बसला आहे.

नाणारच्या कातळावरची पांढरी रेघ

साप्ताहिक कोकण मीडियाच्या ३१ जुलै रोजीच्या अंकाचे संपादकीय…

राजापूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींकडून मुख्यमंत्री निधीला साडेचौदा लाख

रत्नागिरी : करोनाच्या साथीमुळे सार्वजनिक कार्यक्रम होत नसले, तरी त्यासाठी केलेल्या तयारीला आणि उत्साहाला विधायक पर्याय शोधण्याचे प्रयत्न अधूनमधून होताना दिसतात. राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही भपकेबाज कार्यक्रम न करता चौदा लाख एकतीस हजार रुपयांची रक्कम जमवून कोविड-१९चा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री निधीला देऊन असेच उदाहरण घालून दिले आहे.