विघ्नहर्ता आला, रस्त्यांचे विघ्न कायम!

ते रस्ते दुरुस्त होण्याची शक्यता नाही. लोक कंटाळतात आणि तक्रार करायचे थांबतात. नंतर त्यांनाही त्याची सवय होते आणि लोकांच्या अल्पस्मृतीचीच ही सवय शासनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्र्यांना माहीत असते. अनेक वर्षे हे असेच सुरू आहे. यापुढेही तसेच चालणार आहे. विघ्नहर्ता आला. त्याच्यासोबत सण साजरा करून गणपती गावाला जाईल, चाकरमानी मुंबईला परततील. रस्त्यांमधील खड्ड्यांचे विघ्न कायम राहणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईपर्यंत टोल नाही

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सध्या सुरू असून संपूर्ण मार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत या महामार्गावर टोल वसूल केला जाणार नाही. राज्य शासनाने उच्च न्यायालयात तसे हमीपत्र दिले आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पुढच्या वर्षअखेर पूर्ण – सुरेश प्रभू

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली.

समृद्ध कोकण राष्ट्रीय महामार्ग संकल्प पाहणी हातखंब्यातून पुढे सुरू

रत्नागिरी : समृद्ध कोकण राष्ट्रीय महामार्ग संकल्प पाहणीला आज हातखंबा येथून सुरवात झाली. हॉटेल अलंकार येथे समारंभपूर्वक सुरू झालेल्या दौऱ्यापूर्वी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात संजय यादवराव यांनी दौऱ्यासंदर्भात माहिती दिली.

कोकणातील महामार्गाच्या कामाच्या पाठपुराव्यासाठी समृद्ध कोकण महामार्ग अभियान सुरू

पुणे : कोकणातील महामार्गाच्या दहा वर्षे रेंगाळलेल्या कामाच्या पाठपुराव्यासाठी सात डिसेंबरपासून समृद्ध कोकण महामार्ग अभियानास प्रारंभ करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या कामाची गती आणि दर्जा तपासण्यासाठी कोकणवासीयांच्या समितीने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा अभ्यासदौरा सुरू केला आहे. ‘कोकणात दर्जेदार हायवे तातडीने पूर्ण होणे हा आमचा अधिकार आहे,’ असे कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि समृद्ध कोकण महामार्ग अभियानाचे प्रणेते संजय यादवराव यांनी सांगितले.

मुंबई-गोवा महामार्ग १० ते १२ सप्टेंबरपर्यंत काही काळ बंद

राष्ट्रीय महामार्ग विभागाने सूचित केल्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीवरील दोन्ही पूल तसेच संगमेश्वरजवळील शास्त्री पूल या पुलांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. त्याकरिता या दोन्ही पुलांवरील वाहतूक १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत बंद राहणार आहे.