उद्योगमंत्री उदय सामंत यांचा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला सकारात्मक प्रतिसाद

मुंबई : महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील उद्योगांचे गेल्या दोन वर्षांपासूनचे प्रलंबित अनुदान राज्य सरकारने तत्काळ वितरित करावे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. श्री. सामंत यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.

उद्योजकांनी उलगडला यशापयशाचा प्रवास

रत्नागिरी : उद्योजकांचा खडतर प्रवास उलगडणारा आणि शासन व्यवस्थेकडून नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत, हे सांगणारा यू टॉक कार्यक्रम रत्नागिरीत रंगला.

महाराष्ट्र चेंबरच्या कार्यक्रमात कोकणातील उद्योगांविषयीचे मंथन

रत्नागिरी : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कोकणातील उद्योगांविषयीचे विचारमंथन झाले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समुळे कोकणमेव्याच्या निर्यातीला चालना

रत्नागिरी : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समुळे कोकणमेव्याच्या निर्यातीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

सवाल नको, कृतियुक्त जबाबही हवा

रिफायनरीच्या बाबतीत गाव विकास समितीने वेगवेगळे सवाल उपस्थित केले आहेत. या प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगार मिळणार आहे का, हा समितीचा प्रमुख प्रश्न आहे. गाव विकास समितीचे हे प्रश्न योग्यच आहेत. पण प्रश्न उपस्थित केले, म्हणजे ते सुटले, असे होत नाही. पण आपण उपस्थित केलेले प्रश्न सोडविण्यासाठी काही कृती करता येते का, याचाही विचार अशा संस्थांनी करायला हवा.

आता रिफायनरीवरच लक्ष द्यावे

उदय सामंत यांच्याकडे आता उद्योगमंत्रिपद आले आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करून घेऊन त्यांनी रिफायनरीसाठी अधिकाधिक वेळ दिला पाहिजे. प्रकल्पाला कितीही विरोध झाला तरी मतपरिवर्तन होऊ शकेल, अशी त्यांची धारणा आहे. ती लक्षात घेतली तर मुख्य प्रकल्पामध्ये ठरावीक तरुणांना मिळणार असलेल्या नोकऱ्यांपलीकडे जाऊन तेथे रोजगाराच्या दृष्टीने काय होणार आहे, याचा आढावा आणि नियोजन करणे आवश्यक आहे.