रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाउनमध्ये अंशतः शिथिलता; छोट्या गावांना दिलासा

रत्नागिरी : ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात लागू असलेले लॉकडाउन १५ जुलैपर्यंत जारी ठेवण्याचे आदेश अंशत: शिथिलता देऊन कायम ठेवण्‍याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज (आठ जुलै) जारी केले. त्यानुसार पाच हजारपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावांतील सर्व दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. तथापि या दुकानांमध्ये ६० वर्षांपुढील व्यक्ती, तसेच १० वर्षांखालील मुले यांना सामान खरेदी करता येणार नाही. एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला खरेदीची मुभा असेल.

या खेरीज यापूर्वी जारी केलेल्या आदेशातील सर्व निर्बंध १५ जुलै २०२०च्या मध्यरात्री १२पर्यंत कायम ठेवण्यात आल्या आहेत.
(आदेश वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply