रत्नागिरी : नव्या २५ करोनाबाधितांची आज (नऊ जुलै) रत्नागिरीत नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८३९ झाली आहे. दरम्यान, सिंधुदुर्गात आतापर्यंत २०१ जणांनी करोनावर मात केली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
आज (नऊ जुलै) रत्नागिरीत सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – जिल्हा कोव्हिड रुग्णालय २, उपजिल्हा रुग्णालय कामथे – ९, राजापूर – ९, मंडणगड -१, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी – ४.
सध्या जिल्ह्यातील ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २७७ आहे. रत्नागिरी शहरातील बीएसएनएल वसाहत, जेल रोड, रत्नागिरी ही क्षेत्रे करोना विषाणूबाधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
आज जिल्हा कोव्हिड रुग्णालयातून एक, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन येथून ८, कोव्हिड केअर सेंटर, घरडा, लवेल येथून ३ अशा एकूण १२ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ५३४ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात करोनामुळे २८ जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात सध्या ७५ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात २२, दापोली ८, खेड १४, लांजा ५, चिपळूण २०, मंडणगड १ आणि राजापूर तालुक्यात ५ गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत. संस्थात्मक विलगीकरणात असलेल्यांचा तपशील असा – जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी – ४८, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – १, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – १०, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी – १, कोव्हिड केअर सेंटर, घरडा, लवेल – ७, ग्रामीण रुग्णालय गुहागर- ३, केकेव्ही, दापोली – ५. एकूण ७५ संशयित करोना रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात दाखल आहेत.
मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून रत्नागिरी जिल्ह्यात आल्याने होम क्वारंटाइन केलेल्यांची संख्या १५ हजार ८२२ आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत आतापर्यंत करोनाच्या तपासणीसाठी ११ हजार ६७४ नमुने घेण्यात आले. त्यापैकी ११ हजार ४३५ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ८१४ अहवाल पॉझिटिव्ह, तर १० हजार ५८६ निगेटिव्ह आले आहेत. आणखी २३९ नमुन्यांचा अहवाल रत्नागिरीच्या प्रयोगशाळेत प्रलंबित आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी १० रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २०१ झाली आहे. आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या २५० असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात ४३ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून, एक रुग्ण मुंबईत उपचारांसाठी गेला आहे.
…….
