रत्नागिरी : जिल्ह्यात आज (११ ऑगस्ट) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत करोनाचे नवे १०१ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३९१ झाली आहे. सिंधुदुर्गातील रुग्णांची एकूण संख्या ५२२ झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
आज आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील असा – रत्नागिरी ४६, दापोली ८, कळंबणी ६, कामथे २७, अँटिजेन तपासणी १४.
आज तिघा करोनाबाधितांचा मृत्यू झाला. खेड तालुक्यातील पुरे खुर्द येथील ४९ वर्षीय रुग्णाचा रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. चाकाळे (ता. खेड) येथील ६६ वर्षांच्या रुग्णांचा रत्नागिरी येथे दाखल करण्यासाठी आणत असताना प्रवासात मृत्यू झाला. हर्णै (ता. दापोली) येथील ७० वर्षीय रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता ८३ झाली आहे.
आज जिल्हा शासकीय रुग्णालयातून ३, संगमेश्वरमधून एक, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी येथून २, कोव्हिड केअर सेंटर, घरडा ५, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे, चिपळूण येथून १४, कोव्हिड केअर सेंटर रीम्झ हॉटेल एक अशा २६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. होम आयसोलेशनमध्ये असलेले तीन रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची आतापर्यंतची संख्या आता १५९७ झाली आहे. सध्या जिल्ह्यात ७११ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्गातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५२२ झाली असून, त्यापैकी ३६४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आठ जणांचा मृत्यू झाला असून, १५० जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.दोन मेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक लाख ९३ हजार ५३७ व्यक्ती आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या ५२ कन्टेन्मेंट झोन आहेत.
