रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासांत १०० नवे करोनाबाधित रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. १७) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत करोनाचे नवे १०० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळ बाधितांची एकूण संख्या २९४५ झाली आहे. आज बरे झालेल्या ३१ जणांना घरी सोडण्यात आल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या १८४७ झाली असून, हे प्रमाण ६२.७ टक्के आहे. सिंधुदुर्गातील एकूण बाधितांची संख्या ६५८वर पोहोचली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
गेल्या २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत ५७, तर आरटीपीसीआर चाचणीत ४३ असे एकूण १०० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांचा तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी ४३, ॲन्टीजेन टेस्ट – रत्नागिरी ३६, संगमेश्वर ७, गुहागर २, देवरूख २, घरडा रुग्णालय १०.

आज जिल्हा शासकीय रुग्णालयातून ३, कळंबणीतून २, समाजकल्याण भवन, रत्नागिरी येथून २४, तर घरडा, लवेल, खेड येथून २ अशा ३१ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.

आज नाचणे, रत्नागिरी येथील ७२ वर्षीय रुग्ण, दापोलीतील ६४ वर्षीय रुग्ण, तसेच कर्टेल, ता. खेड येथील अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या ६८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता १०५ झाली आहे. सध्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९९३ आहे.

संस्थात्मक विलगीकरणात १६४ जण असून, त्याचा तपशील असा – जिल्हा रुग्णालय ४४, समाजकल्याण, रत्नागिरी ६, उपजिल्हा रुग्णालय, कामथे ४८, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी २७, कोव्हीड केअर सेंटर, घरडा ५, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे ७, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली २०, गुहागर ५, उपजिल्हा रुग्णलय, दापोली १, पाचल १.

मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आल्याने होम क्वारंटाइन केलेल्यांची आजअखेरची संख्या ४५ हजार १९५ आहे. परराज्यातून व अन्य जिल्ह्यांतून रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळपर्यंत एकूण दोन लाख ८५ हजार ९७० व्यक्ती दाखल झाल्या.
………
सिंधुदुर्गातील परिस्थिती
गेल्या काही दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ६५८वर पोहोचली आहे. त्यापैकी ४४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, १२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात सध्या ६५ कंटेन्मेंट झोन आहेत. दोन मेपासून जिल्ह्यात एक लाख ९८ हजार ५०९ नागरिक आले आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply