श्रावण वद्य त्रयोदशी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक २८वा – अनुलोम
हारिसाहसलंकेनासुभेदीमहितोहिसः । चारुभूतनुजोरामोरमाराधयदार्तिहा ।।२८।।
अर्थ : प्रचंड साहसी अशा त्या रामाने रावणवध केल्यावर देवांनी त्याची स्तुती केली. तो सौंदर्यवती भूमिकन्या सीतेसह आहे, तसेच शरणागतांचं दुःख हरण करतो.
।। जय श्रीराम ।।
राघवयादवीयम् – श्लोक २८वा – विलोम
हार्तिदायधरामारमोराजोनुतभूरुचा । सहितोहिमदीभेसुनाकेलंसहसारिहा ।।२८।।
अर्थ : ज्याने प्रद्युम्नाला युद्ध कष्टातून मुक्त केले, नंतर लक्ष्मीला आपल्या हृदयात स्थान दिले, कीर्तिमान जनांचे शरणस्थान, जो प्रद्युम्नाचा हितचिंतक असा तो कृष्ण ऐरावतस्थित स्वर्गलोक जिंकून पृथ्वीवर परतला.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….
रामकथा आणि कृष्णकथा एकाच वेळी वाचता येते, हे राघवयादवीयम् या संस्कृत श्लोकसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. कवी वेंकटाध्वरी यांनी या श्लोकसंग्रहाची रचना केली. या श्लोकांमधील पहिली ओळ वाचली, तर रामकथा होते (त्याला अनुलोम म्हणतात.) याच श्लोकाची अक्षरे उलट्या क्रमाने वाचली, तर ती कृष्णकथा होते. दररोज एका अनुलोम-विलोम श्लोकाचा मराठी अनुवाद येथे दिला जाणार आहे. हा अनुवाद रत्नागिरीतील निवृत्त संस्कृत शिक्षिका सौ. वंदना दिगंबर घैसास यांनी करून दिला आहे.
(राघवयादवीयम् या अद्भुत रचनेविषयी अधिक वाचण्यासाठी आणि आधीच्या श्लोकांचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
….
झोंपाळ्यावरची गीता हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी कृपया 9422382621 या क्रमांकावर संपर्क साधावा.