रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : आज (ता. २६) रत्नागिरी जिल्ह्यात ५०, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे ४० करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३५७५, तर सिंधुदुर्गातील संख्या १०४९ झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरीत आज सापडलेल्या ५० बाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी – २६, ॲन्टीजेन टेस्ट – रत्नागिरी ४, कळंबणी ६, कामथे २, चिपळूण ३, दापोली ८, परकार हॉस्पिटल १.
बरे झालेल्या ५७ जणांना घरी सोडण्यात आले. त्यांचे विवरण असे – जिल्हा रुग्णालय ३, कळंबणी २, संगमेश्वर २६, कामथे १, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी २, घरडा ८, माटे हॉल, चिपळूण ३, होम आयसोलेशन १२. बरे झालेल्यांची संख्या आता २२३१ झाली आहे.
आज दळवटणे (ता. चिपळूण) येथील ४८ वर्षे वयाच्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या १२४ झाली आहे. सध्या १२२० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी उपचार घेत आहेत. संस्थात्मक विलगीकरणात ११२ जण, तर होम क्वारंटाइनमध्ये ११ हजार ५११ जण आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कोव्हिड-१९ कक्षाकडून मिळालेली ही माहिती जिल्हा माहिती कार्यालयातर्फे प्रसिद्धीला देण्यात आली.
सिंधुदुर्गात १३ जणांची करोनावर मात
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार आज १३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५५५ झाली आहे. सध्या जिल्ह्यात ४७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४० व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १०४९ झाली आहे. आज दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या १८ झाली आहे. जिल्ह्यात १६२ ठिकाणी कंटेन्मेंट झोन आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
