मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी डॉ. ठाकूर यांचे इन्फिगो आय केअर हॉस्पिटल रत्नागिरीत

रत्नागिरी : मुंबईतील इन्फिगो आय केअर रुग्णालयांची साखळी निर्माण करणाऱ्या संस्थेने आपले पंधरावे हॉस्पिटल रत्नागिरीत सुरू केले आहे, अशी माहिती इन्फिगो आय केअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

प्रास्ताविकात डॉ. प्रदीप देशपांडे यांनी मसाखळी आणि ती तयार करणारे मूळचे भांबेड (ता. लांजा) येथील डॉ. श्रीधर ठाकूर यांच्याविषयीची माहिती दिली. जगभरात ठिकठिकाणी रुग्णालये तयार करण्याचा अनुभव डॉ. ठाकूर यांना असून त्या बळावर दीड वर्षापूर्वी त्यांनी इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सुरू केले. अल्पावधीत त्याची साखळी निर्माण झाली असून मुंबईमध्ये वाशी, दादर, माहीम, बोरिवली, भाईंदर, विरार, पालघर, बोईसर, इचलकरंजी येथे सुसज्ज हॉस्पिटल्स कार्यरत आहेत. डॉ. ठाकूर यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरीत झाले. आपल्या अनुभवाचा उपयोग आपली जन्मभूमी असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याला व्हावा, त्यानिमित्ताने आपल्या मातृभूमीचे ऋण फेडता यावे, यासाठी त्यांनी रत्नागिरीत पंधरावे हॉस्पिटल सुरू केले आहे, असे डॉ. देशपांडे यांनी सांगितले.

डॉ. ठाकूर म्हणाले, वर्षभरात या हॉस्पिटलमध्ये एक लाखांहून अधिक रुग्णांवर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ अनुभवी डॉक्टर्सच्या माध्यमातून डोळ्यांच्या गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार करण्यात आले आहेत. भारतामध्ये मोतिबिंदूमुळे येणारे अंधत्व, मधुमेहाचा डोळ्यांवर होणारा परिणाम, कॉम्प्युटर किंवा मोबाइल फोनच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांचे उद्भवणारे आजार, अधिक वेळ एअरकंडिशन वातावरणात बसल्याने उद्भवणाऱ्या डोळ्यांच्या समस्या, काचबिंदू किंवा ग्लुकोमा यासारखा डोळ्यांचा दृष्टिनाश करणारा आजार या प्रमुख समस्या आहेत. डोळ्यांचे अनेक विभाग असून प्रत्येक व्याधीवर उपचार करणारे प्रशिक्षित तज्ज्ञ असतात. याची फार कमी सर्वसामान्यांना माहिती असते. डोळ्यांच्या विविध आजारांचे भारतातील प्रख्यात संस्थांमधून प्रशिक्षण घेतलेले तज्ज्ञ डॉक्टर्स इन्फिगोमध्ये रत्नागिरीतही उपलब्ध असणार आहेत. या हॉस्पिटलमध्ये जर्मनी व अमेरिका येथून आणलेली अत्याधुनिक निदान यंत्रणा उपलब्ध आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रेटिना किंवा डोळ्यांचा पडदा यावर उपचार करणारे पूर्णवेळ डॉक्टर जवळजवळ उपलब्ध नाहीत. साधारणतः दहा ते बारा टक्के व्यक्तीं ना मधुमेह असतो. त्यांच्या रक्ताततील साखरेचा डोळ्यांवर आणि त्याच्या पडद्यावर होणारा वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे काही वेळेस अंधत्वही येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक मधुमेह व्यक्तीाने वर्षातून किमान एकदा तज्ज्ञ रेटिना डॉक्टरकडून डोळ्यांचा पडदा तपासणे आवश्यक ठरते. ती सोय इन्फिगोमध्ये आहे. डॉ. प्रसाद कामत हे चेन्नईत शंकर नेत्रालयात उच्च शिक्षण घेतलेले रेटिना सर्जन रुग्णांवर उपचार करणार आहेत. डॉ. कामत मूळचे लांजा तालुक्यातील आहेत. त्यांनी रेटिना किंवा डोळ्याच्या पडद्याच्या अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अत्यंत कौशल्याने केल्या असून त्यांचा रुग्णपरिवार सुरत, मुंबई, रांची, पटना, इंदूर, नागपूर, पुणे अशा अनेक ठिकाणी पसरला आहे. डॉ. प्रसाद कामत इन्फिगो आय हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला रेटिनाविषयक तज्ज्ञ सल्ला व उपचार स्थानिकरीत्या उपलब्ध होतील. येथे शस्त्रक्रिया करण्यासाठी जर्मनीमध्ये बनवलेला मायक्रोस्कोप व मशिन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरमध्ये बसवण्यात आले आहे.

डॉ. ठाकूर म्हणाले, लहान मुलांमधील डोळ्यांतील तिरळेपणा, लेझी आईज किंवा इतर दृष्टिदोषांचे वेळीच निदान व उपचार झाले तर त्यांतील व्यंग दूर होऊ शकते. इन्फिगो आय केअरमध्ये डॉ. प्रदीप देशपांडे हे ख्यातनाम तज्ज्ञ डॉक्टर लहान मुलांच्या दृष्टिदोष व दृष्टिव्यंगावर उपचार व विविध अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर ओळखले जातात.

मोतिबिंदू शस्त्रक्रिया सध्या उच्च तंत्रज्ञानामुळे अधिक सोपी व सुलभ झाली असून इन्फिगोमध्ये ए-स्कॅन, बी-स्कॅन, लेन्स मास्टर, याग लेझर व अर्टली मशिन यांनी मोतिबिंदू विभाग सुसज्ज असून डॉ. किरण हिरजे, डॉ. स्वप्ना गंधे, डॉ. नितीन तिवारी हे उच्च प्रशिक्षित तज्ज्ञ भूल न देता बिनटाक्याची मोतिबिंदूवरील मायक्रोफेकोनीट ही शस्त्रक्रिया करतात. या शस्त्रक्रियेनंतर पंधरा मिनिटांत रुग्णाला घरी जाता येते, असेही डॉ. ठाकूर म्हणाले.

काचबिंदू किंवा ग्लुकोमा यांवर निदान व उपचार करणारे तंत्रज्ञान म्हणजेच फिल्ड अनालिसीस मशिन रत्नागिरीत उपलब्ध असल्याचे सांगून डॉ. ठाकूर म्हणाले, इन्फिगो आय केअर हॉस्पिटल ही एका विशिष्ट ध्येयाने नेत्रसेवा देणारी संस्था असून रुग्णांना सर्वोत्तम सल्ला व उपचार रास्त दरामध्ये मिळावेत व तज्ज्ञ डॉक्टर्सची सेवा गावे अथवा जिल्हा पातळीपर्यंत पोहोचावी, हे उद्दिष्ट ठेवून रत्नागिरी शहरात आली आहे. डोळ्यांच्या सर्वच आजारांवर संबंधित उपचार व संपूर्ण उपचार यंत्रणा रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना उपलब्ध व्हावी व त्यांना कोणत्याही कारणासाठी मुंबईला जाण्याची गरज पडू नये, लोकांचे पैसे व वेळ वाचावा हा मुख्य उद्देश यामागे आहे. डोळ्यांच्या संबंधित या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमुळे रत्नागिरी शहराला एक नवीन ओळख मिळेल व येथील नागरिकांचा वेळ, प्रवास, मानसिक त्रास व पैसे वाचतील. योग्यवेळी उपचार उपलब्ध झाल्याने दृष्टीचे पुढील नुकसान टळेल, असेही डॉ. ठाकूर यांनी सांगितले.

रुग्णालयात एक कौन्सेलर असेल. तो रुग्णांना त्याच्यावर करणे आवश्यक असलेल्या उपचारांची तसेच खर्चाची माहिती देणार आहे, असेही डॉ. ठाकूर म्हणाले.

यावेळी डॉ. किरण हिरजे, डॉ. स्वप्ना गंधे, डॉ. प्रदीप देशपांडे उपस्थित होते.

रुग्णालयाचा पत्ता –
इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, शांतादुर्गा संकुल, साळवी स्टॉप, रत्नागिरी
संपर्क क्र. – ९३७२७६६५०४, ९३७२७ ६६४९१

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply