रत्नागिरीत ३२, तर सिंधुदुर्गात ३४ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२५ ऑक्टोबर) ३२, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज नवे ३२ रुग्ण आढळले. त्यांचा तालुकानिहाय आणि चाचणीनिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – खेड ५, रत्नागिरी १०, लांजा २ (एकूण १७). रॅपिड अँटिजेन टेस्ट – दापोली ४, चिपळूण ३, रत्नागिरी ७ (एकूण १५). (दोन्ही मिळून ३२) जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८३७५ झाली आहे. बाधितांचा दर १५.०५ टक्के आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत दोघा पुरुष रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दोन्ही रुग्ण रत्नागिरीतील असून, एक शासकीय आणि एक खासगी रुग्णालयातील आहे. एका रुग्णाचे वय ७०, तर दुसऱ्याचे ८२ वर्षे होते. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३१३ झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.७३ टक्के आहे. मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – रत्नागिरी ८५, खेड ५०, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७४, संगमेश्वर ३२, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.

रत्नागिरी जिल्ह्यात आज १३ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७७३४ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९३.२६ टक्के आहे. सध्या २२४ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२५ ऑक्टोबर) २० जण, तर आतापर्यंत एकूण ४१३४ जण करोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४९६ आहे. जिल्ह्यात आज आणखी ३४ जणांचे करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. आजपर्यंतच्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७५६ आहे. आज दोघांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यापैकी एक ६० वर्षीय महिला रुग्ण नेरूर (ता. कुडाळ) येथील, तर दुसरा ७२ वर्षीय पुरुष रुग्ण माणगाव (ता. कुडाळ) येथील आहे. आजपर्यंत करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या १२६ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी नऊ जण चिंताजनक असून, त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी सात जण ऑक्सिजनवर, तर दोघे व्हेंटिलेटरवर आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply