Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरी जिल्ह्यात नवे ४३० करोनाबाधित, ४६८ करोनामुक्त

Photo by Markus Spiske on Pexels.com

Advertisements

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (४ जुलै) ४३० नवे करोनाबाधित आढळले, तर ४६८ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील आजची करोनाची स्थिती काहीशी दिलासादायक आहे.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – १९२, अँटिजेन चाचणी – १५२ (एकूण ३४४). आधी नोंद न झालेल्या ८६ रुग्णांची नोंद आज झाली. त्यांच्यासह जिल्ह्यातील आजचे एकूण रुग्ण ४३० आहेत. त्यांच्यासह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६३ हजार ९८२ झाली आहे. जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर ७.२१ झाला आहे. एकूण रुग्णवाढीचा दर १३.९४ टक्के आहे.

आज पाच हजार ५४६ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात दोन हजार ६१० गृह विलगीकरणात, दोन हजार ९३६ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आणखी ५६८ जणांची कोविन पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे.
आज सहा हजार २८३ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख २ हजार १३८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ४६८ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ५६ हजार ५१ झाली आहे. करोनामुक्तांची आजची टक्केवारी ८७.६० टक्के आहे.

जिल्ह्यात आज ३ आणि आधीच्या ४ अशा ७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ८१७ झाली आहे. मृत्युदर २.८४ टक्के झाला आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ५९४, खेड १७०, गुहागर १३८, दापोली १५३, चिपळूण ३५६, संगमेश्वर १६६, लांजा ९४, राजापूर १०७, मंडणगड २५. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १८१७).

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version