रत्नागिरी जिल्ह्यात नवे ५१४ करोनाबाधित, ६६१ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१ जुलै) ५१४ नवे करोनाबाधित आढळले, तर ६६१ रुग्ण करोनामुक्त झाले.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – २५९, अँटिजेन चाचणी – १८८ (एकूण ४४७). आधी नोंद न झालेल्या ६७ रुग्णांची नोंद आज झाली. त्यांच्यासह जिल्ह्यातील आजचे एकूण रुग्ण ५१४ आहेत. त्यांच्यासह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६२ हजार ६१४ झाली आहे. जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर ८.५७ झाला आहे. एकूण रुग्णवाढीचा दर १४.२८ टक्के आहे.

आज सहा हजार ८३ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात दोन हजार ६३८ गृह विलगीकरणात, दोन हजार ८१३ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आणखी ६३२ जणांची कोविन पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे.
आज सात हजार ५९ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख ८३ हजार २९ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ६६१ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ५४ हजार ७४२ झाली आहे. करोनामुक्तांची आजची टक्केवारी ८७.६५ टक्के आहे.

जिल्ह्यात आज ११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ७८९ झाली आहे. मृत्युदर २.८६ टक्के झाला आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ५८३, खेड १६८, गुहागर १३८, दापोली १५१, चिपळूण ३५२, संगमेश्वर १६१, लांजा ९३, राजापूर १०४, मंडणगड २५. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १७८९).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply