स्वयंसेवी संस्थांसाठी प्रकल्प प्रस्ताव लेखन कार्यशाळा

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा उपक्रम

पुणे : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या पुणे शाखेतर्फे स्वयंसेवी संस्थांसाठी प्रकल्प प्रस्ताव लेखनाची ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. प्रामुख्याने कंपन्यांचा सीएसआर निधी मिळविण्याच्या दृष्टीने त्यामध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे.

संस्थात्मक पातळीवर कोणताही प्रकल्प राबवायचा असेल तर निधीची गरज असते. तो कसा मिळवायचा, हा वर्षानुवर्षांचा संस्थांचा यक्षप्रश्न आहे. पण गेल्या काही वर्षांत त्यासाठीचा कंपन्यांचा सीएसआर निधी हा एक राजमार्ग म्हणता येईल असा स्रोत निर्माण झाला आहे. हा निधी मिळवायचा असेल, तर त्यासाठी तितक्याच ताकदीने प्रकल्प प्रस्तावही तयार करता यायला हवा. तो कसा करायचा नि त्यातून निधी मिळवायचा कसा, याचा हमखास यशाचा मार्ग खुला करणारी कार्यशाळा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या पुणे शाखेतर्फे आयोजित करण्यात आली आहे.

करोनानंतरच्या काळात कंपन्यांकडे निधी उपलब्ध आहे का, या विषयीचे कायदे काय सांगतात, प्रकल्प प्रस्ताव लेखनाचे नेमके तंत्र काय, इत्यादी अनेक प्रश्नांची नेमकी उत्तरे मिळविण्यासाठी या संवादात्मक चार दिवसीय कार्यशाळेत नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यशाळेत प्रकल्प प्रस्ताव लेखन गरज, महत्त्व आणि उपयोग, प्रकल्प प्रस्ताव तयार करताना आवश्यक अहवाल लेखन आणि प्रकल्प शाश्वतता, प्रकल्प संनियंत्रण, मूल्यमापन, परिणामांचे मूल्यमापन, स्वयंसेवी संस्था आणि निधी देणार्याप संस्था यांच्यातील समन्वय, निधी मिळविण्याचे विविध मार्ग, संस्थांकडून अपेक्षा याविषयी माहिती दिली जाईल. तसेच प्रकल्प प्रस्ताव लेखनाचा कृतिसराव घेतला जाईल. कार्यशाळा २२ ते २५ जुलै असे चार दिवस सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत चालणार आहे. प्रत्येक प्रतिनिधीचे प्रवेश शुल्क एक हजार १२०० रुपये आहे.

अधिक माहितीसाठी राहुल टोकेकर (९८२२९७१०७९), संतोष गोगले (९२२६४४८४८१) किंवा प्रबोधिनी कार्यालय (७२०८०७०८७३) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नावनोंदणी आणि शुल्क भरण्यासाठी https://iidl.org.in/ppw/ या लिंकवर जावे किंवा सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply