रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (५ जुलै) २२७ नवे करोनाबाधित आढळले, तर ४३० रुग्ण करोनामुक्त झाले. सलग दुसऱ्या करोनामुक्तांची संख्या ४०० हून अधिक आहे. विशेष म्हणजे आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.
आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – ९५, अँटिजेन चाचणी – ८३ (एकूण १७८). आधी नोंद न झालेल्या ४९ रुग्णांची नोंद आज झाली. त्यांच्यासह जिल्ह्यातील आजचे एकूण रुग्ण २२७ आहेत. त्यांच्यासह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६४ हजार २०९ झाली आहे. जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर ५.३२ झाला आहे. एकूण रुग्णवाढीचा दर १३.८५ टक्के आहे.
आज पाच हजार ४४८ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात दोन हजार ४६१ गृह विलगीकरणात, दोन हजार ९८७ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आणखी ४६६ जणांची कोविन पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे.
आज चार हजार ६५८ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ६ हजार ७९६ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
जिल्ह्यात आज ४३० रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ५६ हजार ४८१ झाली आहे. करोनामुक्तांची आजची टक्केवारी ८७.९६ टक्के आहे.
जिल्ह्यात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ८१७ एवढीच आहे. मृत्युदर २.८३ टक्के आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ५९४, खेड १७०, गुहागर १३८, दापोली १५३, चिपळूण ३५६, संगमेश्वर १६६, लांजा ९४, राजापूर १०७, मंडणगड २५. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १८१७).

