सिंधुदुर्गात नवे २७७ करोनाबाधित, १७८ रुग्ण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नवे २७७ रुग्ण आढळले, तर १७८ रुग्ण करोनामुक्त झाले, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज, ५ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत १७८ आणि एकूण ३७ हजार १६८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज दुबार तपासणी केलेल्या ५ जणांसह नवे २७७ करोनाबाधित रुग्ण आढळले. एकूण बाधितांची संख्या आता ४३ हजार २५१ झाली आहे.

सध्या जिल्ह्यात ५ हजार ५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ६०, दोडामार्ग – २, कणकवली – ४७, कुडाळ – ७८, मालवण – २१, सावंतवाडी – २४, वैभववाडी – १२, वेंगुर्ले – २८.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ७२७, दोडामार्ग १५८, कणकवली ८०६, कुडाळ १०९५, मालवण ९८८, सावंतवाडी ५१६, वैभववाडी २१८, वेंगुर्ले ४७७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २०. सक्रिय रुग्णांपैकी २१० रुग्ण ऑक्सिजनवर तर ४५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात तिघांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १०७६ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड १, कणकवली १, मालवण १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १४२, दोडामार्ग – ३१, कणकवली – २१६, कुडाळ – १६४, मालवण – २१८, सावंतवाडी – १५१, वैभववाडी – ६७, वेंगुर्ले – ८१, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply