Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे २ नवे रुग्ण; तेवढेच करोनामुक्त

person with a face mask and latex gloves holding a globe

Photo by Anna Shvets on Pexels.com

Advertisements

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (११ डिसेंबर) दोन नवे करोनाबाधित आढळले, तर तेवढेच बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या २७ आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत करोनाचे दोन नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार ११२ झाली आहे. आज दोन रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ५९६ एवढी आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.८२ आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ७३४ पैकी ७३२ अहवाल निगेटिव्ह आणि दोन पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या सर्व ४४३ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ४५ हजार ९४ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या २७ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले १३, तर लक्षणे असलेले १४ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या १३, तर संस्थात्मक विलगीकरणात १४ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ९, तर डीसीएचमध्ये ५ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी ५ जण ऑक्सिजनवर असून, दोन रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४८९ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. या आठवड्यात तो ३.१५ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७४, चिपळूण ४७८, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८२९, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४८९).

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version