सिंधुदुर्गात एकाच दिवशी ७९ जण करोनामुक्त

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ११ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर एकाच दिवशी तब्बल ७९ रुग्ण करोनामुक्त झाल्याने घरी गेले. रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे १४ रुग्ण आढळले, तर तेवढेच रुग्ण करोनामुक्तीमुळे घरी जाऊ शकले.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार १४ (रत्नागिरी २, चिपळूण ४, संगमेश्वर आणि लांजा प्रत्येकी ३), तर अँटिजेन टेस्टनुसार २ (दापोली आणि गुहागर प्रत्येकी १) असे एकूण ११ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात सध्या १४९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात होम आयसोलेशनमध्ये ६७ जण आहेत, तर सर्वाधिक ४० रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या नऊ हजार १६९ झाली आहे. आज चाचणी घेतलेल्या आणखी ११३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला.

जिल्ह्यात आज १४ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आल्याने करोनामुक्त झालेल्यांची संख्या आठ हजार ६६० झाली असून करोनामुक्तीचा हा दर ९४.४५ टक्के आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नसल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ३२७ एवढीच आहे. मृत्युदर ३.५६ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे ११ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या पाच हजार ८३५ झाली आहे. सध्या २३० रुग्ण सक्रिय आहेत. आज एकाच दिवशी ७९ रुग्ण करोनामुक्त झाले. एकाच दिवशी एवढे रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांच्यासह जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या पाच हजार ४४४ झाली आहे. आतापर्यंत १५५ जणांचा मृत्यू झाला.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply