Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरी जिल्ह्यात ५ नवे करोनाबाधित, ६ करोनामुक्त

coronavirus news on screen

Photo by Markus Spiske on Pexels.com

Advertisements

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २७ डिसेंबर) करोनाचे नवे ५ रुग्ण आढळले, तर ६ रुग्ण करोनामुक्त झाले. सक्रिय करोनाबाधितांची संख्या २६ झाली आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार १५२ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ६३६ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.८२ झाली आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या २५३ पैकी २४८ निगेटिव्ह, तर ५ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेले सर्व १२१ नमुने निगेटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ५७ हजार ८९२ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या २६ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले १५, तर लक्षणे असलेले ११ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या १५, तर संस्थात्मक विलगीकरणात ११ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ५, तर डीसीएचमध्ये ६ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी एक रुग्ण ऑक्सिजनवर आहे, तर तर २ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४९० एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.१५ टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७४, चिपळूण ४७९, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८२९, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४९०).

लसीकरणाची स्थिती

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या तपशिलानुसार २४ डिसेंबर रोजी झालेल्या करोनाप्रतिबंधक लसीकरण सत्रांत १४७८ जणांनी पहिला, तर १०,९०५ जणांनी दुसरा डोस घेतला. एकूण १२३८३ जणांचे लसीकरण झाले. कालपर्यंत जिल्ह्यातील १० लाख ४ हजार ६३ जणांचा पहिला, तर ६ लाख ३३ हजार ८४८ जणांचे दोन्ही डोसेस घेऊन झाले आहेत. एकूण १६ लाख ३७ हजार ९११ जणांचे लसीकरण जिल्ह्यात पार पडले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version