coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधितांची संख्या २०० हून अधिक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ११ जानेवारी) करोनाचे नवे २०३ रुग्ण आढळले, तर ६५ रुग्ण करोनामुक्त झाले. सक्रिय करोनाबाधितांची संख्या ६२२ झाली आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ८० हजार ७६ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ९४२ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी आणखी घटून ९६.०९ झाली आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ५८२ पैकी ५०३ निगेटिव्ह, तर ७९ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ११३१ पैकी १००७ नमुने निगेटिव्ह, १२४ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ७३ हजार १३९ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ६२२ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ४८४, तर लक्षणे असलेले १३८ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ४८४, तर संस्थात्मक विलगीकरणात १३८ जण आहेत. वीस रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ६०, तर डीसीएचमध्ये ७८ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी ११ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात एकही रुग्ण दाखल नाही.

आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४९२ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.१ टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७४, चिपळूण ४८०, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८३०, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४९१).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply