coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात दोन नवे करोनाबाधित; एक करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १९ डिसेंबर) दोन नवे करोनाबाधित आढळले, तर एक रुग्ण करोनामुक्त झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या कालच्या २९वरून आज ३०वर गेली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार १३४ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ६१४ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.८२ आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ९३४ पैकी ९३२ नमुने निगेटिव्ह आले, तर दोन पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेले सर्व ३१६ नमुने निगेटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ५२ हजार २४६ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ३० रुग्णांपैकी लक्षणे नसलेले १०, तर लक्षणे असलेले २० रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या १०, तर संस्थात्मक विलगीकरणात २० जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ९, तर डीसीएचमध्ये ११ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी ६ जण ऑक्सिजनवर असून, एक रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४९० एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७४, चिपळूण ४७९, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८२९, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४९०).

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply