Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे ७ रुग्ण, एकमेव करोनामुक्त

dispenser with soap and corona word

Photo by Jessica Lewis Creative on Pexels.com

Advertisements

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ५ मार्च) करोनाचे नवे ७ रुग्ण आढळले. आज एकमेव रुग्ण करोनामुक्त झाला. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार ४५० रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८१ हजार ९०१ म्हणजे ९६.९८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या २९७ पैकी २९१ जणांचा अहवाल निगेटिव्ह, तर ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ३५६ पैकी ३५५ रुग्णांचे नमुने निगेटिव्ह, तर एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख २७ हजार ८४७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या १२ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ११, तर लक्षणे असलेला १ रुग्ण आहे. गृह विलगीकरणात ११, तर संस्थात्मक विलगीकरणात १ जण आहे. ३ रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे.

अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये आणि सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. डीसीएचमध्ये १ रुग्ण आहे. बाधितांपैकी ऑक्सिजनवर एकही रुग्ण नाही, तसेच अतिदक्षता विभागातही एकही रुग्ण नाही.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याने मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५३४ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२३, खेड २३१, गुहागर १८२, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२९, रत्नागिरी ८४१, लांजा १३२, राजापूर -१६७. (एकूण २५३४).

जिल्ह्यातील लसीकरण

रत्नागिरी जिल्ह्यात ४ मार्च रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ५५ सत्रे पार पडली. त्यात १९५ जणांनी लशीचा पहिला, तर १,९२३ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण २,३१६ जणांचे लसीकरण ४ मार्च रोजी झाले. ४ मार्चपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ५२ हजार ४३५ जणांचा पहिला, तर ८ लाख ६२ हजार ३५ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण २० लाख ७ हजार ८०३ जणांचे लसीकरण झाले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version