

लांजा : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नव्याने स्थापन झालेल्या लांजा शाखेच्या अध्यक्षपदी कवी, सुप्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. विलास कुवळेकर यांची निवड झाली आहे.
मसापच्या लांजा शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून उपाध्यक्षपदी सौ. विजयालक्ष्मी देवगोजी, तर सचिवपदी विजय हटकर यांची निवड करण्यात आली.
या सभेला शाखेचे सभासद प्रा. डॉ. राहुल मराठे, प्रा. डॉ. महेश बावधनकर, विधीज्ञ राजेश गुरव, डॉ. प्रफुल्ल सप्रे, वसंत देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र साहित्य परिषद या मराठी भाषा आणि साहित्याची जपणूक, विकास आणि प्रचारासाठी स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्थेने कोकणातील वाङ्मयीन चळवळीच्या विकासासाठी लांजा, राजापूर आणि देवरूख या तीन नव्या शाखांना मंजुरी दिली.
या पार्श्वभूमीवर लांजा येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेची सभा विधिज्ञ विलास कुवळेकर यांच्या ‘वाग्यज्ञ’ निवासस्थानी झाली. सभेत लांजा शाखेच्या कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. सन २०२२ ते २०२५ या तीन वर्षासाठी कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यात श्री. कुवळेकर यांची अध्यक्षपदी, सौ. विजयालक्ष्मी देवगोजी उपाध्यक्षपदी, तर सचिवपदी विजय हटकर यांची निवड झाली. नूतन कार्यकारिणीमध्ये सदस्यपदी निरंजन देशमुख, प्राध्यापक डॉ. राजेश माळी, डॉ. मनीषा सप्रे यांची निवड करण्यात आली.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

