कोकण रेल्वेची ११ नोव्हेंबरला मडगाव-मुंबई विशेष गाडी

नवी मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर येत्या ११ नोव्हेंबर रोजी मडगाव-मुंबई सीएसएमटी मार्गावर विशेष गाडी धावणार आहे. 01428 क्रमांकाची ही गाडी एकमार्गी असून परतीचा प्रवास करणार नाही. ही गाडी शुक्रवार, ११ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजता सावंतवाडीतून मुंबईला रवाना होईल.

ही गाडी येत्या शुक्रवारी, ११ नोव्हेंबर रोजी पहाटेपूर्वी १२ वाजून ३० मिनिटांनी (म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर) सुटणार आहे. ती बारा तासांनी म्हणजेच सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी ती आपला प्रवास पूर्ण करेल.

ही गाडी थांबणार असलेली स्थानके आणि तेथील वेळा अशा :करमळी (मध्यरात्रीनंतर १ वाजून १० मिनिटांनी), सावंतवाडी (पहाटे २.१५ वाजता), कणकवली (पहाटे २.३८), रत्नागिरी (पहाटे ४.१५), चिपळूण (सकाळी ६.०२), खेड (सकाळी ६.४०), रोहा (९.२५), पनवेल (१०.४०), ठाणे (११.१५) आणि दादर (११.४२). गाडीला १७ डबे असतील. त्यापैकी १५ डबे द्वितीय श्रेणी शयनयान असतील.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply