मुंबई : भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेतर्फे बी. जी. देशमुख वार्षिक खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी नेतृत्व आणि समाजात विकसित होत असलेली महिलांची भूमिका, महाराष्ट्रातील नागरी प्रशासनात झालेले बदल आणि आव्हाने हे दोन विषय आहेत.

कोणत्याही एका विषयावर इंग्रजी किंवा मराठीतून निबंध सादर करावा. तो ३ हजार शब्दांपेक्षा कमी आणि ५ हजार शब्दांपेक्षा जास्त नसावा. निबंध विषयाच्या अनुषंगाने विश्लेषणात्मक, संशोधनपर आणि पदव्युत्तर दर्जाचा असणे अपेक्षित आहे. निबंध कागदाच्या एकाच पृष्ठभागावर टंकलिखित करून त्यावर केवळ टोपणनाव लिहून चार प्रतीत मानद सचिव, भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा, तळ मजला, बँक ऑफ महाराष्ट्रच्या बाजूला, मंत्रालय, मुंबई- ४०००३२ या पत्त्यावर २८ फेब्रुवारी २०२३ पर्यत पाठवावा.
स्पर्धकाने निबंधावर आपले नाव किंवा कोणत्याही प्रकारची ओळख नमूद करू नये. निबंधाच्या प्रती व त्यासोबत वेगळ्या लिफाफ्यात स्पर्धकाचे नाव (मराठी व इंग्रजीतून) टोपणनाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई-मेल पत्ता नमूद करून पाठवाव्यात. निबंध स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
या स्पर्धेची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी संकेतस्थळ –
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
