Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

संगीत हे बंध रेशमाचे – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

Advertisements

अंतिम फेरी – रत्नागिरी केंद्र

नाटक दि. ४ फेब्रुवारी २०२३, सायंकाळी ७.०० वाजता

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ४ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत हे बंध रेशमाचे हे नाटक गोव्यातील संस्थेने सादर केले.

सादर करणारी संस्था :

ॐ कलासृष्टी, बांदोडा, फोंडा, गोवा

धर्माची नशा वाईट असते. तिची परीक्षा घेऊ नये. धर्म निष्पाप, अजाण असतो. माणुसकीचे बोट धरून धर्म चालतो, तेव्हा पृथ्वीवर स्वर्ग अवतरल्याचा भास होतो. पणनुसत्या धर्माचे बोट धरून माणूस जेव्हा चालायला लागतो, तेव्हा स्वर्गाचा नरक बनायला फारसा वेळ लागत नाही. पाठीशी घेतलेली चीजवस्तूच नव्हे, पण बरोबरची माणसेसुद्धा कडेपर्यंत सुखरूप पोहोचत नाहीत. भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर हे बंध रेशमाचे नाटक दोन मित्रांच्या अतूट मैत्रीवर साकारले आहे.

श्रेयनामावली
लेखक : रणजित देसाई
दिग्दर्शक : शशिकांत विनायक नागेशकर
तबला : शैलेश गावकर
ऑर्गन : प्रदीप शीलकर
पार्श्वसंगीत : ओंकार नागेशकर
प्रकाशयोजना : रामदास कुर्पासकर
नेपथ्य : सुरजित च्यारी, सत्यम नाईक, गौतम नाईक
रंगभूषा : सुरेंद्र वळवईकर
वेषभूषा : सौ. प्रीतम फडते

भूमिका आणि कलावंत
श्रीकांत : विनोद मुकुंद नाईक
अमीर : विघ्नेश गोविंद नाईक
रेश्मा : कु. करिश्मा काशिनाथ नाईकमुळे
लक्ष्मी : कु. सोनाली नाईक
रोशन : कु. श्रीजा गौरेश फडते
उमर : प्रणव सुभाष नाईक
दाऊद: संजय मोहन च्यारी
बन्सी :. श्रीनिवास तुळशीदास नाईक
बक्षी :. दर्शन रंगू नाईक
खान :. संदीप पुंडलिक फडते
जुम्मन :. सीताराम नाईक
गुंड : प्रथमेश पोकळे
मराठी गुंड : मंथन महेश नाईक
छोटी श्यामा : कु. युग्मा श्रीनिवास नाईक

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version