मुंबई : मुंबई विकास समिती आणि राष्ट्रीय मतदाता मंचातर्फे ‘CITIZENS’ EXPECTATIONS FOR MUMBAI DEVELOPMENT 2023-28’ (मुंबईच्या विकासाबाबत नागरिकांच्या अपेक्षा) या अहवालाचे प्रकाशन येत्या सोमवारी (दि. २० फेब्रुवारी) मुंबईत करण्यात येणार आहे.
या प्रकाशन समारंभाला भारतीय जनता पार्टीतर्फे आमदार अतुल भातखळकर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रवक्त्या आमदार प्रा. डॉ. मनीषा कायंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आणि नगरसेवक संदीप देशपांडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. काँग्रेसच्या वक्त्याचे नाव नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
दादर (पश्चिम) येथील विठ्ठल मंदिर सभागृहात सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता होणार असलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक मुंबई विकास समितीचे नंदकुमार साळवी (9422432765) आणि सहसंयोजक राष्ट्रीय मतदाता मंचाचे अनिल गचके (9821731281) यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

