संगीत आपुलाची वाद आपणासी – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

अंतिम फेरी – रत्नागिरी केंद्र

नाटक दि. १६ फेब्रुवारी २०२३, सायंकाळी ७.०० वाजता

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत १६ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत आपुलाची वाद आपणासी हे नाटक पुण्यातील संस्था सादर करणार आहे.

सादर करणारी संस्था :

आगम, पुणे

काय आहे नाटक?

संत तुकाराम महाराजांच्या लहान भावाने घेतलेला त्यांचा शोध या नाटकात डॉ. समीर मोने यांनी मांडला आहे. आपले अस्तित्व कशासाठी, आपल्या इथे असण्याचा उद्देश काय, याचा शोध या नाटकाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

काही नाटके सादरीकरणापुरती मर्यादित राहत नाहीत. ती आपल्या जगण्याचा एक भाग होऊन जातात. आपल्या जगण्याविषयी प्रश्न निर्माण करतात. अस्तित्वाचा शोध घ्यायला भाग पाडतात. अनेक अनुत्तरित प्रश्नांची उकल करतात नि एखाद्या घटनेकडे नव्याने पाहायला भाग पडतात. या दोन ओळींच्या मधला अर्थ शोधण्याचा प्रवास जगण्याला नवा अर्थ देऊन जातो. हेच आपुलाची वाद आपणासी या नाटकात सांगण्यात आले आहे.

हे नाटक म्हणजे
………………… तुकाच्या शोधाचं
………….. आवलीच्या कारुण्याचं
………….. कान्होबाच्या बंधुप्रेमाचं
……………. सावजीच्या विरक्तीचं
…. विठठल असण्याचं.. नसण्याचं
……….. ज्याच्या त्याच्या विठ्ठलाचं
…….. गाथा तरंगण्याच्या रहस्याचं
……………….. अभंगांच्या रचनेचं
………………….. टाळ – गोधडीचं
…………………… नारायणबुवांचं
…………………. वारकरी परंपरेचं
……….. जन्म-मरणाच्या फेऱ्याचं
………………….. अस्तित्ववादाचं
…… आनंदाची ओवरी शोधण्याचं

या नाटकाद्वारे अश्विनी करंदीकर प्रथमत:च दिग्दर्शन करीत असून संगीत दिग्दर्शक विलास भोसले यांनी पहिल्यांदाच संगीत नाटकासाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. यात डॉ. समीर मोने यांनी पदरचना केल्या आहेत. त्याचसोबत संत तुकारामांचे अभंग, संत ज्ञानेश्वर यांच्या विराण्या तसेच संत सोयराबाईंची रचनाही यात आहे. संगीत दिग्दर्शनात विविध रागांचा उपयोग केला गेला आहे, जेणेकरून नाट्यसंगीताचा पाया आमच्याकडून जपला जावा.

श्रेयनामावली
लेखक : डॉ. समीर मोने
दिग्दर्शक : अश्विनी करंदीकर
सहाय्यक दिग्दर्शक : वैभव नवसकर
संगीत दिग्दर्शक : विलास भोसले

भूमिका आणि कलावंत
पात्र परिचय
तुकाराम – विलास भोसले
कान्होबा- अथर्व तारकुंडे
सावजी – अक्षय साळुंखे
आवली – दीप्ती मोडक
कान्होबा पत्नी : आर्या ओंबळे
सावजी पत्नी : सिद्धी चव्हाण
आई : जयश्री जावळे
वडील : वैभव नवसकर
येडा जन्या : संतोष शिंदे
कान्होबाचा विठ्ठल : ओजस अत्तरदे
तुकोबांचा विठ्ठल : निखिल पारगे
विश्वंभर, सालोमालो : चैतन्य थरकुडे
गावकरी : जय काळे, प्रथमेश ननवरे, पृथ्वी माने, गिरीश कर्पे
मुले : रुद्र चांदेरे, आयुष सालके, वेदांत संत
मुलगी : मानसी जावळे

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply