रत्नागिरी : येथील प्रसिद्ध फोटो स्टुडिओ कांचन डिजिटलतर्फे आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून बक्षीस वितरण येत्या शऩिवारी (दि. ३० सप्टेंबर) होणार आहे.
रत्नागिरी तालुक्यातील ११० स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला. यंदा वैविध्यपूर्ण ऐतिहासिक, पौराणिक, वैज्ञानिक सामाजिक देखावे, तसेच आकर्षक आरास थक्क करणारी होती. परीक्षकांना निकाल लावणे कठीण गेले. गणेशभक्तांचा उत्साह आणि गणेशाविषयी अपार श्रद्धा यातून दिसून आली. स्पर्धेचे परीक्षण अभिजित नांदगावकर, नरेंद्र जगन्नाथ पाटील, विजय पाडावे, विजय बासुतकर, अमृता मायनाक, शकील गवाणकर, अजिंक्य सनगरे, आदेश मयेकर आणि कांचन मालगुंडकर यांनी केले.
स्पर्धेचा निकाल असा – प्रथम – १२ हजार रुपये – संदीप मेस्त्री – सडेवाडी, जयगड (देखावा -चंद्रयान 3), द्वितीय – आठ हजार रुपये – चारुदत्त धावलकर- ब्राह्मणवाडी गावखडी (देखावा – मार्कंडेय), तृतीय – पाच हजार रुपये – अनंत साळवी – फणसोप (देखावा – दशावतार).



विशेष उल्लेखनीय बक्षिसे अशी : (प्रत्येकी दोन हजार रुपये) – अनिल गोताड- (गावणवाडी, कोतवडे : देखावा- संत गोरोबा), अनिकेत सुपल (सह्याद्रीनगर, नाचणे : देखावा – चांद्रयान), आशीष वाडकर (मिरजोळे, देखावा- जेजुरी), मयूर भितळे (सोमेश्वर, देखावा- समाजसेविका सिंधुताई सपकाळ), उत्तेजनार्थ (प्रत्येकी ५०० रुपये) – रमेश माचकर (सुतारवाडी, शिरगाव, देखावा- गोवर्धन), श्रीपाद शिवलकर (नागझरेवाडी, बसणी, देखावा-सामाजिक संदेश), घाटकर कुटुंबीय (शेंडगेवाडी, पावस, देखावा- चांद्रयान). प्रोत्साहनपर (ट्रॉफी व प्रमाणपत्र) – संतोष नेवरेकर (बसणी, देखावा- कालिया मर्दन), अर्जुन माचिवले (तरळ-माचीवलेवाडी, देखावा- वाचाल तर वाचाल), मंगेश घाणेकर (घाणेकरवाडी-नरबे, देखावा -जंगल), जीवन कोळवणकर (उत्कर्ष नगर- कुवारबाव, देखावा- वराह अवतार), संजय वर्तक (कुवारबाव, देखावा- देशभक्तीपर), सागर कुंभार (कुंभारवाडी, पावस, देखावा- निसर्ग देखावा), अजित साळवी (जुईवाडी, फणसोप, देखावा- कोळी गणपती), सागर चौगुले (काळबादेवी, देखावा- हिमालय), साईराज वाडकर (मिरजोळे, देखावा- राधाकृष्ण), रामदास झापडेकर ( कर्ला, देखावा- परशुरामभूमी वटपौर्णिमा), राजेंद्र खानविलकर (रत्नागिरी, देखावा- कलाकुसर), साहिल शिवलकर (रत्नागिरी, देखावा- कलाकुसर), अवधूत सावंत (रत्नागिरी, देखावा- मोबाइलचे दुष्परिणाम), साईराज पोटफोडे, (रत्नागिरी, देखावा- नैसर्गिक), सचिन बेर्डे (रत्नागिरी, देखावा- वारली पेंटिंग).
येत्या शनिवारी, ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता भैरव मंगल कार्यालयात पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आहे. यावेळी रत्नागिरीतील पाच निवडक मंडळांचे मंगळागौर सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाला गणेशभक्तांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन कांचन मालगुंडकर यांनी केले आहे.

