मुंबई : विज्ञानलेखनाला प्रोत्साहन तसेच विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करण्याच्या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेतर्फे राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा आयोजित केली आहे.
विद्यार्थी गटासाठी (बारावीपर्यत) इ-कचरा आणि खुल्या गटासाठी प्रकाश प्रदूषण हे विषय आहेत. निबंध स्पर्धेकरिता शब्दमर्यादा १५०० ते २००० इतकी असून अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२४ आहे. शैक्षणिक गटाकरिता अनुक्रमे दोन हजार आणि दीड हजार, तर खुल्या गटाकरिता अडीच हजार आणि दोन हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.
या विनाशुल्क स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी तसेच निबंध पाठविण्यासाठी मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२ (दूरध्वनी : (०२२) ४८२६३७५०/४८२६००९४ येथे संपर्क साधावा. https://mavipa.org या संकेतस्थळावरही अधिक माहिती मिळेल.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

