मुंबई : मराठी विज्ञान परिषदेने सलग दहावी राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा आयोजित केली आहे.
स्पर्धा शैक्षणिक गट (आठवी ते बारावी) आणि खुला गट (पदवी महाविद्यालये व नाट्यसंस्था) अशा दोन गटांकरिता घेतली जाते. एकांकिकेमध्ये शास्त्रज्ञांच्या कारकिर्दीतील प्रसंग अथवा विज्ञानकथा वा वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित विषय असणे अपेक्षित आहे. प्राथमिक व अंतिम अशा दोन स्तरावर स्पर्धा घेऊन विजेते निवडले जातात. अंतिम फेरीतील दोन्ही गटांत प्रथम तीन क्रमांकांना स्मृतिचिन्ह आणि अनुक्रमे ३१,०००, २१,००० ११,००० रुपयांची, तर काही वैयक्तिक पारितोषिकेही दिली जातात.
प्रवेशिका पाठवण्याकरिता अंतिम मुदत १० ऑगस्ट २०२४ असून स्पर्धेच्या सविस्तर माहितीसाठी https://mavipa.org/rajyastareey-vidnyan-ekankika-spardha-2024/ ही लिंक पाहावी. तसेच ९९६९१००९६१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

