आकाशवाणीचे निवृत्त निवेदक सुरेश भावे यांचे निधन

रत्नागिरी : आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे निवृत्त निवेदक सुरेश भावे यांचं काल रात्री (२६ जानेवारी) पुण्यात निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. त्यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता. त्यांचा पार्थिव देह आज सकाळी रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला. १९७६ साली आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र सुरू झालं. त्यानंतर लगेचच म्हणजे १९७७ साली त्यांची तिथे निवड झाली आणि २००६ साली ते निवृत्त झाले. या काळात त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण आवाज केवळ निवेदनाच्या रूपानेच नव्हे, तर श्रुतिका, नभोनाट्यं, रूपकांसह अनेक कार्यक्रमांच्या माध्यमांतून श्रोत्यांपर्यंत पोहोचत राहिला आणि त्यांनी श्रोत्यांच्या मनात स्थान मिळवलं. प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमी क्षेत्रातही त्यांचं योगदान होतं. तसंच कीर्तनकार म्हणूनही त्यांनी नावलौकिक प्राप्त केला होता. आकाशवाणीवरूनही त्यांची काही कीर्तनं प्रसारित झाली होती. पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह त्यांना लाभला होता. संगीत क्षेत्राचीही त्यांना जाण होती. त्यांच्या निधनामुळे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply