पालघर : नरपड (ता. डहाणू) येथे येत्या ३१ मे आणि १ जून रोजी स्वस्तात मस्त शाश्वत घर बांधण्याविषयीचे सशुल्क शिबिर होणार आहे.
आजकाल घर बांधणे हा विषय खूपच कठीण बनला आहे. अनेकांना अनेक वर्षे पैसे गोळा करावे लागतात, तर काहींना कर्ज काढावे लागते. तरीही मनासारखे घर बांधले जात नाही. हे लक्षात घेऊन घर बांधकाम हा विषय थोडा सोपा केला आहे. त्यासाठी दोन दिवसांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे.
शिबिरात सहभागी झाल्यास कमीतकमी पैशात सुंदर, नीटनेटके मोकळेपणा असलेले घर सहजपणे बांधता येईल. गवंडी, सुतार, मजुरांच्या मदतीने घर बांधता येते. महत्त्वाचे म्हणजे या घरात अजिबात गरम होणार नाही. घर कायम थंड राहणारे असेल. तेथे पंखे, एसीची गरज नाही. भरपूर उजेडही असेल.
ज्या व्यक्तींना दोन दिवसांच्या शिबिरात यायचे आहे, त्यांनी नावनोंदणी करावी. फक्त घर बांधण्याबरोबरच तणावमुक्त जीवन सहजपणे कसे जगावे, हा विषयही तेथे शिकविला जाणार आहे, शिवाय निसर्ग शेतीची माहितीही दिली जाईल. शिबिर शुल्क आणि अन्य माहितीसाठी कुंदन राऊत (7276613732), सुयोग दीक्षित (9325409389) किंवा विकास चव्हाण (9867112174) यांच्याशी संपर्क साधावा.
शिबिराचे शुल्क प्रत्येकी दोन हजार रुपये आहे. हे शुल्क वीर राऊत यांच्या 7276584426 या फोन पे नंबरवर भरावे.
शिबिर 31 मे आणि 1 जून रोजी नरपड (ता. डहाणू, जि. पालघर) येथे होईल. नरपड गाव डहाणू रोड रेल्वे स्टेशनपासून पाच किलोमीटरवर आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड




