रत्नागिरी : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती कोकण प्रांतातर्फे राज्यस्तरीय लेख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
गरवारे व्यवसाय शिक्षण व विकास संस्था,मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर पदविका मराठी पत्रकारिता वर्गातर्फे मराठी भाषा गौरव दिन व महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेली ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आणि निःशुल्क आहे. प्रत्येक स्पर्धकाला दिलेल्या विषयांपैकी एकच विषय निवडायचा आहे.
ते विषय असे – १) डिजिटल युगातील मराठी भाषा संधी आव्हाने आणि भविष्य, २) सोशल मीडियावरील मराठी पत्रकारिता जबाबदारी की ट्रेंड, ३) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मराठी भाषेचे बदलते स्वरूप, ४) डिजिटल युगात वाचन संस्कृतीमध्ये झालेले बदल, ५) जागतिकीकरणाच्या काळात मराठीची ओळख आणि अस्तित्व, ६) सायबर युगात महिलांची सुरक्षितता जाणीव आणि जबाबदारी, ७) मराठी भाषेतील स्टार्टअप आणि कंटेंट क्रिएशनचे वाढते क्षेत्र, ८) आजच्या युवा पिढीसाठी मराठी भाषेत असलेल्या रोजगार संधी
लेखाची शब्दमर्यादा ८०० ते १००० शब्द असेल. शब्दमर्यादा पाळणे आवश्यक आहे. शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे. लेख युनिकोडमध्ये टंकलिखित करून वर्ड फाइल स्वरूपात पाठवावेत. लेख पीडीएफमध्ये पाठवू नयेत. लेख स्वलिखित असावेत.
लेख gicediekhanspardha@gmail.com या मेलवर २८ फेब्रुवारीपर्यंत पाठवावेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर नावनोंदणी करणे बंधनकारक आहे. https://forms.gle/k2FYSJQriUJNNQvTA
पुरस्कारप्राप्त लेखांची प्रसिद्धी वर्गाच्या नियतकालिकात करण्यात येईल. तज्ज्ञ परीक्षकांचा/ आयोजकांचा निर्णय अंतिम असेल.
अधिक माहितीसाठी प्रा. सौ. नम्रता कडू (७९७७४८९०७६) किंवा प्रवीण देशमुख (७५०६७४०६५२) यांच्याशी संपर्क साधावा.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

